No icon

पिंपरी : Daksh Police Times

 डांगे चौक ते काळेवाडी फाटा येथे अतिक्रमणाची मोठी कारवाई

 डांगे चौक ते काळेवाडी फाटा येथे अतिक्रमणाची मोठी कारवाई यामध्ये लाखाचे नुकसान कारवाई करून सुद्धा अतिक्रमण लोकांच्याकडून काढण्यात आलेला नाही यामुळे लास्ट स्टेज म्हणून पालिकेने कारवाई करण्याचा प्रयत्न केला यामध्ये लोकांचा न लोकांना यामध्ये विडी कांबळे आणि गायकवाड यांच्या टीमने ही कारवाई करण्यात आली आहे

ग क्षेत्रीय कार्यालय प्रभाग क्र. 23 च्या अंतर्गत औंध - रावेत BRTS रस्त्यालगतच्या अनधिकृत पत्राशेडवर आज दि. 01.03.2024 रोजी कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई मा. आयुक्त श्री. शेखर सिंग व मा. शहर अभियंता श्री. मकरंद निकम यांच्या आदेशान्वये तसेच मा. क्षेत्रीय अधिकारी श्री. अजिंक्य येळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सदर कारवाईअंतर्गत फुटपाथ व रस्त्यावर येणारे अंदाजे 7 अनधिकृत पत्राशेड व टपऱ्या जमीनदोस्त करण्यात आल्या तसेच अतिक्रमण हटवण्यात आले.
सदर कारवाईस मा. क्षेत्रीय अधिकारी श्री. अजिंक्य येळे, बीट निरीक्षक श्री. अनिश ओक व श्री. विनोद बजबळकर, मा. उप अभियंता श्री. सुनील अहिरे, कनिष्ठ अभियंता श्री. सुशीलकुमार लवटे, 2 अतिक्रमण निरीक्षक, 10 मजूर व अंदाजे 40 MSF जवान उपस्थित होते. 
सदर कारवाई झाल्यामुळे फूटपाथ मोकळा झाला असून सदर कारवाईबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

 

 

Daksh Police Times

Comment As:

Comment (0)